Share

जामीन मिळताच नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया; “…म्हणून मी सरेंडर झालो”

Published On: 

सावंतवाडीः संतोष परब हल्लाप्रकरणी आमदार नितेश राणे यांना जामीन मिळाला आहे. तसेच त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज त्यांनी पहिली प्रतिक्रिया देत थेट मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री नेमकं अधिवेशनाच्या वेळी गळ्यात बेल्ट का घालतात, ईडीच्या कारवाई सुरू झाल्यावर कोरोना कसा होतो? असा सवाल नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी केला आहे.

यावेळी त्यांनी “पुढील तपासणीसाठी रुग्णालतात जाणार असून जनतेला त्रास नको म्हणून मी स्वतःहून शरण आलो. मात्र, आता तब्येत बरी होईपर्यंत आराम करणार आहे. आता मी बरा झाल्यानंतर बोलेन, त्या दिवशी खूप लोकांचा बीपीचा त्रास सुरू होईल”, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

तसेच मी कुठल्याही तपास कार्यातून लांब गेलो नव्हतो. जेव्हा-जेव्हा संपर्क करण्यात आला, फोन आला, तेव्हा मदत केली. कुठल्याही तपासकार्यात अडथळे आणले नाही. सर्व माहिती देत होतो आणि यापुढे देणार आहे. मी विधिमंडळाचा सदस्य आहे.२ वेळा निवडून आलेला प्रतिनिधी आहे. जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. त्यामुळे कुणीही माझे सहकार्य मागतात, तेव्हा एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी सहकार्य करत होतो, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

तसेच ज्या दिवशी मी शरण आलो, त्याच्या ४ दिवसांपर्यंत मला कोर्टाचं संरक्षण देण्यात आलं. पण जे कोर्टाबाहेर घडलं, गाडी अडवण्यात आली, सहकाऱ्यांना केसेसमध्ये अडकवण्यात आलं. त्यामुळे मी विचार केला. सिंधुदुर्गाच्या लोकांना त्रास होऊ नये, कायदा सुव्यवस्थेचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी सरेंडर झालो.असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!