मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेआहे. ज्यात त्याला दुसऱ्या सामन्यातही खेळण्याची संधी मिळाली . मिळालेल्या संधीचा फायदा करत दोन्ही सामन्यांमध्ये हुड्डाने चांगली कामगिरी करत सगळ्यांनाच प्रभावित केले आहे. सामना संपल्यानंतर दीपक हुड्डाने आपल्या लहानपणीचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगिलते आहे.
दीपक हुड्डाने सामना संपल्यानंतर सूर्यकुमार यादवशी बोलताना त्याच्या स्वप्नाबद्दल मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला ” मी पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले, तो अविसरमणीय अनुभव होता. आपण याच क्षणांसाठी मेहनत घेत असतो. धोनी किंवा विराट यांच्याकडून कॅप मिळावी, हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. कोहलीच्या हातून कॅप घेणे माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.”
From his dreams and motivation to receiving #TeamIndia cap from @imVkohli! ???? ????@HoodaOnFire shares it all in this interview with @surya_14kumar after India win the 2⃣nd @Paytm #INDvWI ODI. ???? ???? By @Moulinparikh
Watch the full interview ???? ???? https://t.co/5roTjdrMAR pic.twitter.com/dBglzXqmJE
— BCCI (@BCCI) February 10, 2022
रोहित शर्माच्या कर्णधारपदात भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजचा ४४ धावांनी पराभव केला. सोबतच मालिकेत २-० अशी आघाडी घेत मालिका जिंकली आहे. भारताने दुसऱ्या सामन्यात विंडीजला ९ बाद २३७ चे लक्ष दिले होते. भारतीय संघाने उत्तम गोलंदाजी करत विंडिजला १९३ धावांवर सर्वबाद केले.
महत्वाच्या बातम्या
- जामीन मिळताच नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया; “…म्हणून मी सरेंडर झालो”
- ‘…सुरुवात नितीन गडकरींच्या घरापासून करा’; नाना पाटोलेंचे आवाहन
- द ग्रेट खलीचा राजकारणात प्रवेश
- IPL 2022: सुरेश रैना पुन्हा ‘या’ संघात जाणार ?
- Lakhimpur Kheri violence : शेतकर्यांना चिरडल्याचा आरोप असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला मिळाला जामीन


