Share

‘…सुरुवात नितीन गडकरींच्या घरापासून करा’; नाना पाटोलेंचे आवाहन

Published On: 

नागपूर: काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील केंद्रीय संस्थांच्या कारवाईच्या मुद्द्यावर मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र सरकारचा उद्देश भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा उद्देश असेल, तर याला कॉंग्रेसचा पाठिंबा असेल, असं नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले केंद्र सरकारवर टीका करताना म्हणाले, केंद्र सरकारचा उद्देश भ्रष्टाचार समूळ नष्ट करायचा उद्देश असेल, तर जे भ्रष्टाचारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी याला काँग्रेसचा पाठिंबा आहे. पण फक्त भाजपात नसतील ते भ्रष्टाचारी असं सुरू आहे. विरोधात असतील, मोदी सरकारच्या कारभारावर टीका करत असतील त्यांच्यावर कारवाई करायचं षडयंत्र भाजपा केंद्रात बसून करत आहे. हे चुकीचं आहे. म्हणून भाजपाने आधी आपली घरं तपासली पाहिजे, असं पटोले म्हणाले.

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, जर भ्रष्टाचारावर कारवाई करायची असेल तर संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्या आधी सुरुवात नितीन गडकरी यांच्या घरापासून केली पाहिजे. कारण त्यांच्या कंपन्या नकली होत्या हे त्यावेळी सिद्ध झालं होतं, असे आवाहन नाना पटोले यांनी केंद्र सरकारला केले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!