नांदेड : कोरानाच्या संसर्गाच्या वाढत्या रुग्ण संख्या लक्षात घेता नांदेड जिल्ह्यातील १३ तालुक्यामध्ये आता ऑक्सिजन जनरेशन प्लांटची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे. नांदेड जिल्हाचा विस्तार लक्षात घेता तालुकास्तरावर वैद्यकीय सेवा तत्काळ पोहचण्याच्या हेतुने ही पाऊले उचलण्यात आली आहेत.
नांदेड जिल्ह्याचा विस्तार खुप मोठा आहे. नांदेड शहरासह ग्रामीण भागामध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परंतू रुग्णालये, डॉक्टरर्स, वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याने अनेक रुग्णांना उपचार तसेच ऑक्सिजन, कोराना टेस्ट, रेमिडिसीविर, कोराेना लसीकरण करण्यासाठी योग्य ते कर्मचारी नसल्याने अनेकांना स्वत:चे प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन उपलब्ध करण्याच्या हेतुने किनवट तसेच देगलूरच्या धर्तीवर लवकरच ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यात येणार आहे.या माध्यमातून रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्यास ग्रामीण भागातून रुग्ण नांदेड शहरामध्ये येत असतात. त्यामुळे त्याचा वेळ तसेच आर्थिक, शारिरीक नुकसान होत असते. त्यामुळे सोमवारी मालेगाव येथे तसेच अर्धापूर येथे कोविड केअर सेंटर देखील उभारण्यात येणार आहेत.
शुक्रवारी चव्हाण यांनी सांगितले की, गंभीर रुग्णांचे दररोज आढावा घेवून नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच कोरानाचे इंजेक्शनची कमतरता नाकारता येत नाही, परंतू कोरोना बाधीत रुग्मांवर केवळ हा एकच उपचार असल्याचा गैरसमज दुर करावा असे आवाहन देखील या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी केले. मालेगाव तसेच भोकर येथील ट्राम केअर सेंटरमध्ये कोव्हिड केअर सेंटर देखील सुरु करण्यात येणार आहे. येथे प्रत्येकी ३० बेडची सुविधा उपलब्ध आहे. तर सोमवारपासून मालेगाव येथील सेंटरमध्ये ३० खाटांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘प्रसिद्धीसाठी काही लोकांकडून रेमडेसिवीरचे वाटप’, धनंजय मुंडेंवर पंकजांचा निशाणा
- आशियाई कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंचे तिहेरी सुवर्णयश
- धक्कादायक! कोरोना वार्डात ऑक्सिजन संपले, दुसरीकडे नेताना महिला रुग्णाचा मृत्यू
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांवर खा.हिना गावित संतापल्या!

