अहमदनगर : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातला आहे. यामुळे आरोग्य सेवा देखील अपुऱ्या पडत असून हे संकट पुन्हा एकदा गडद होत असल्याचं चित्र निर्माण होत आहे. यामुळे महाराष्ट्रात १४ एप्रिल रात्री आठ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात १४४ कलम म्हणजेच संचारबंदी लागू करण्यात आली असून अतिमहत्वाचे व अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांना बाहेर फिरता येणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मात्र, अनेक ठिकाणी गर्दी आटोक्याबाहेर गेल्याच चित्र समोर आलं आहे. त्यामुळे नक्की संचारबंदी आहे की नाही ? असा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी भाजीपाला, किराणा व इतर आवश्यक सुविधा सुरु ठेवण्यात आले आहेत. मात्र, तरीदेखील नागरिक किराणा दुकानाबाहेर, भाजी मार्केटमध्ये, लोकलमध्ये मोठी गर्दी करत असल्याने नियम अधिक कठोर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आता अहमदनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी यांनी राज्यात लॉकडाऊन आणखी कठोर करण्याचे संकेत दिले आहेत. ‘हलगर्जीपणा करणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचं’ मुश्रीफ यांनी सांगताना लॉकडाऊन आणखी कठोर करण्याचे संकेत दिले आहेत. अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज शिर्डीत आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आलीय. मात्र भाजीपाला, फळे, दूध आणि किराणा खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवत नाहीत. पोलिसांना संयम ठेवण्यास सांगितल्याने कठोर कारवाई करता येत नाही. त्यामुळे यावर अत्यावश्यक सेवेतील काही गोष्टींवर निर्बंध आणण्याचे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्याचं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या
- आजचा सामना, मुंबईविरुद्ध सनरायजर्स आमने-सामने
- ऑरेंज आर्मीच्या चाहत्यासाठी खुशखबर; केन विलियमसन लवकरच संघात परतन्याचे दिले संकेत
- ‘मोदी निवडणुकीत व्यस्त आहेत, तुम्ही नंतर फोन करा’, मुख्यमंत्री ठाकरेंना मिळाले उत्तर
- सामना जिंकल्यानंतर धोनीनं टीमसोबत केलं खास सेलिब्रेशन : पहा व्हिडीओ
- ‘दर पावसाळ्यात पक्ष बदलणाऱ्या अतुल लोढेंनी गडकरी-फडणविसांना प्रश्न विचारणे हास्यास्पद आहे’


