Share

‘मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना ३ वेळा फोन केला पण ते सध्या बंगालाच्या प्रचारात व्यस्त आहेत’

Published On: 

मुंबई : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत राज्याची आरोग्य व्यवस्था कोलमडून पडली आहे. बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीरचा प्रचंड तुडवडा प्रत्येक जिल्ह्यात जाणवत आहे. रुग्ण बेड्स अभावी जीव सोडत आहेत. तर रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी पळापळ करावी लागत आहे.

याच पार्शभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या २४ तासात तब्बल तीनवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करायची आहे. पण सकाळपासून ठाकरे हे पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी फोन करत आहेत. परंतु पंतप्रधान मोदी हे सध्या बंगालमध्ये प्रचारात व्यस्त असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अद्याप तरी त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिलेली आहे.

यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर अनेक गंभीर आरोप देखील केले आहे. ‘ पंतप्रधान मोदी यांना सध्या लोकांच्या जीवापेक्षा निवडणुका आणि सत्ता महत्वाची वाटत आहे. अशा गंभीर परिस्थिती बंगाल कोर्टाकडून सुद्धा प्रचार न करण्याचे आवाहन केले जात आहे परंतु पंतप्रधान मोदी लोकांचे जीव धोक्यात घालून प्रचारसभा घेत आहेत.’ असे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत.

तसेच त्यांनी केंद्र सरकारवर आणखी गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!