Share

कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवण्यात येणार – पेडणेकर

Published On: 

मुंबई – उत्तराखंडमधील हरीद्वार येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात झालेल्या गर्दीमुळे हजारो भाविकांसह, साधू-संताना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर येत आहे. त्यानंतर कुंभमेळ्यामुळे निर्माण झालेल्या संसर्गाच्या संकटाची गंभीर दखल केंद्र सरकारने घेतली आहे. कोरोनाच्या प्रकोपाने हैराण झालेले केंद्र सरकार लवकरात लवकर कुंभमेळा संपावा, यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र यासाठी सरकारी आदेश काढावा लागू नये, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

कुंभमेळा लवकर संपला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशारा आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे. येत्या काही काळात आखाड्यांची निवास व्यवस्था ही कोरोना कँप होतील, अशी परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. दुसरीकडे पोलीस आणि प्रशासनानेही हात वर केले असून, लवकरात लवकर कुंभ संपावा, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान,महाराष्ट्रात देखील कोरोनामुळे स्थिती गंभीर बनली असून या कुंभमेळ्यातून अनेकजण मुंबईत येतील अशी शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातून येणाऱ्या लोकांना थेट विलगीकरणात पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. जर राज्यात अशीच परिस्थिती राहिली तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितले.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, भावना-भक्ती या सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्ही जिवंत राहिलात तरच. काही गोंधळी लोक या लोकांना उकसवत आहेत, असा टोलाही किशोरी पेडणेकरांनी भाजपला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!