🕒 1 min read
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचाच बोलबाला आहे. क्रुझ पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने कारवाई करत अटक केल्यापासून नवाब मलिकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर आर्यनला जामीन मिळाला आणि मलिकांनी या ड्रग्ज प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यावरुन आता भाजप चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
भाजपचे आमदार अतुलल भातखळकर यांनी नवाब मलिकांवर टीका केली आहे. ‘नवाब मलिक हा जावयामुळे वेडा झालेला जगातील पहिला सासरा आहे’, असं अतुल भातखळकर म्हणाले आहेत. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. दरम्यान, नवाब मलिकांच्या जावयाला ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक झाली असून ते तब्बल 8 महिन्यापेक्षा जास्त दिवस अटकेत आहेत. त्यांना अद्याप जामीनही मंजूर झाला नाही. यामुळेच नवाब मलिक अशी बेताल वक्तव्य करत असल्याच्या टीका विरोधकांकडून केल्या जात आहेत.
नबाब मलिक हा जावयामुळे वेडा झालेला जगातला पहिला सासरा आहे…
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) November 2, 2021
देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच नीरज गुंडे ड्रग्ज व्यवसायिक असून तो फडणवीस सरकारच्या काळात वाद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा दूत बनून उद्धव ठाकरेंना मांडवलीसाठी भेटायचा, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. यावरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या
- माणूस एकदम भला आहे, पण कधीच खरं बोलत नाही; भातखळकरांचा राऊतांना टोला
- मी दाखवतो कोण पार्ट्या करतात; नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा
- ‘अहो राऊत, परमबीर सिंहांना अजून तुम्ही पदावरून दूर ही केलं नाही, अन्..’, भाजपचा घणाघात
- ‘ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी गुन्हे शाखेत आणि EOWला मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश द्यावेत’
- दुसऱ्याची मालमत्ता जप्त करुन अजितदादा पवारांचं नाव गोवण्याचं कारस्थान; मलिकांचा भाजपवर गंभीर आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
