मुंबई : पत्रकार परिषदेत बोलत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्याची आर्थिक परिस्थिती समजून घेतली पाहिजे. ते न करता रोज सकाळी आरोप प्रत्यारोप होत आहेत. कुठेतरी याला मर्यादा घातली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. तसेच राष्ट्रवादीचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे एका चिडीतून सगळं करतायत हे मला माहिती आहे. त्यांच्या कुटुंबावर जो प्रसंद आणि संकट आलं होतं ते आम्ही जवळून पाहिल आहे. त्यामुळे कोणीतरी प्रमुख व्यक्तीने पुढाकार घेऊन मार्ग काढला पाहिजे. प्रमुख व्यक्ती मुख्यमंत्री किंवा शरद पवार आहेत. ज्यांना महाराष्ट्राच्या हिताची आणि प्रतिष्ठेची चिंता आहे, असेही राऊत म्हणाले.
यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,’हे आरोप-प्रत्यारोपाच राजकारण थांबले पाहिजे. या आरोपांच्या चिखलफेकीत मोठ्यांनी लक्ष देणं गरेजचं आहे. नवाब मलिकांचे आरोप संतापातून होत आहेत. काल मी राज्यपालांना भेटलो त्यांनी देखील यावर चिंता व्यक्त केली.’
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’कुणी कोणता फोटो दाखवला तर तो सबंध असल्याचा पुरावा होऊ शकत नाही. रियाज भाटीचे फोटो नरेंद्र मोदी यांच्यासोबत देखील आहेत. भाजपाकडे जी वॉशिंग मशीन आहे त्यामध्ये घातले की सगळे स्वच्छ होतात. ती मशीन भाजपाने तयार केली आहे. गुंड, दाऊद, शकीलचे लोक आमच्याकडे असले तर याचा माणूस त्याचा माणूस मात्र भाजपाच्या वॉशिंग मशिनमध्ये गेला की एकदम चकचकीत शुभ्र होतो. सध्याच्या राजकारणात कोणीही कोणाकडे बोट दाखवू नये. महाराष्ट्रात रोज चिखलफेक सुरू आहे यांना कंटाळा कसा येत नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि इतर प्रश्नाकडे पाहायला हवं.’
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत सकारात्मक निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही- गोपीचंद पडळकर
- काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांनी घेतली आमदारकीची शपथ
- ठाकरे सरकारचा निर्णय, मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांची संख्या वाढली
- राष्ट्रवादीचे सहकार पॅनेल जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात
- आम आदमी पक्ष खऱ्या हिंदुत्वाचे अनुसरण करत आहे; केजरीवालांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

