Share

मेट्रोचं काम थांबवण्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान, नवाब मलिकांचा आरोप

Published On: 

मुंबई : मेट्रो कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा जोरदार संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य सरकारनं आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवलं आहे.

कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही. यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणे चुकीचे आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा. कारशेड उभारणीवरुन केंद्र सरकारचे मोठे नुकसान होणार आहे असे केंद्राने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

याबाबत तातडीने हस्तक्षेप करीत ‘एमएमआरडीए’ने सुरू केलेले कारशेड उभारणीचे काम थांबवावे. ही जागा ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरीत करण्याचा आदेश रद्द करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगावे, असे केंद्राने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

आता यावरून जोरदार राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. मेट्रोचं काम थांबवण्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान सुरु असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. सर्व बाबी तपासून राज्य सरकार केंद्राला उत्तर देईल, अशी माहितीही मलिकांनी दिली आहे. ‘केंद्र सरकारने 2002 मध्ये मिठागाच्या अनेक जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित केल्या आहेत. ही खासगी जमीन असल्याचा दावा यापूर्वी भाजपनेच केला होता आणि आता केंद्र सरकार त्यावर आपला दावा सांगत आहे. भाजपला मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा असल्यानंच हे कटकारस्थान सुरु आहे, असा गंभीर आरोप मलिक यांनी केला आहे. केंद्राचा हा दावा तपासून राज्य सरकार केंद्राला योग्य उत्तर देईल, असंही मलिक यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!