Share

बिहारने अशा जंगलराज आणि डबल-डबल युवराजांना नाकारलं – नरेंद्र मोदी

Published On: 

अररिया : बिहारमध्ये एकीकडे दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या अररिया जिल्ह्यात सभा घेतली. यावेळी ते म्हणाले ‘बिहारच्या लोकांना आपलं मत बनवलं आहे. घराणेशाही आणि चमकधमक हरत आहे. घोटाळे पराभूत होत आहेत. लोकांचे न्याय्य हक्क जिंकत आहेत.’ यावेळी त्यांनी म्हटले की ‘प्रत्येक गरीब व्यक्तीला घर दिले जाईल. कोरोनामुळे प्रत्येकाला पक्कं घर मिळण्याचं काम मंदावलं आहे पण ते पुन्हा सुरू होईल.’

मोदी म्हणाले ‘बिहारच्या जनतेच्या मनात अजून जुन्या काळातल्या निवडणुकीच्या नोंदी ताज्या असतील. या लोकांनी निवडणुका म्हणजे खेळ बनवला होता. निवडणुका म्हणजे चोहीकडे हत्या, हिंसा, बूथ कॅप्चरिंग हेच होत असे. सामान्य माणसाचा मतदानाचा अधिकार पण हिरावला गेला होता. बिहार ने अशा जंगलराज आणि डबल-डबल युवराजांना नाकारलं आहे.’ बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्या टप्प्यात 94 जागांसाठी आज (3 नोव्हेंबर) मतदान होत आहे. 17 जिल्ह्यांमधल्या या जागांसाठी सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल.

निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण 1,463 उमेदवार रिंगणात आहेत. मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव, त्यांचे मोठे भाऊ तेज प्रताप यादव यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांचं भवितव्य मतदानाच्या या दुसऱ्या टप्प्यात निश्चित होईल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा जिल्हा असलेल्या नालंदामध्येही मतदान होत आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!