🕒 1 min read
मुंबई: मेट्रो कारशेडवरून केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा जोरदार संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य सरकारनं आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एमएमआरडीएनं कांजूरमार्गमध्ये कामाला सुरुवात केली. मात्र आता केंद्रानं कांजूरमार्गमधील जागेवर दावा सांगितला आहे. तसं पत्र केंद्राच्या उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागानं (डीपीआयआयटी) राज्य सरकारला पाठवलं आहे.
कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही. यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणे चुकीचे आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा. कारशेड उभारणीवरुन केंद्र सरकारचे मोठे नुकसान होणार आहे असे केंद्राने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
याबाबत तातडीने हस्तक्षेप करीत ‘एमएमआरडीए’ने सुरू केलेले कारशेड उभारणीचे काम थांबवावे. ही जागा ‘एमएमआरडीए’ला हस्तांतरीत करण्याचा आदेश रद्द करण्यास जिल्हाधिकाऱ्यांना सांगावे, असे केंद्राने राज्य सरकारला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या 11 ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.आता केंद्र सरकारने दिलेल्या या पत्रानंतर आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. तसेच केंद्राच्या या पत्रानंतर राज्य सरकार यावर काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- जीव गेला तरी बेहत्तर, पण माफी मागणार नाही – मुनव्वर राणा
- करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे सोनी टी.व्ही.आणि अमिताभ बच्चन येणार गोत्यात ?
- पंचनाम्याचे दुस-यांदा नाटक कशासाठी..? शेतकऱ्यांना सरसकट मदत करा-भाजपा
- भ्रष्टाचारी एकनाथ खडसेंना आमदार करू नका; दमानिया यांनी घेतली थेट राज्यपालांची भेट
- काँग्रेसला नाराजीचा मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
