🕒 1 min read
मुंबई : ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीत. सुरुवातीपासूनच हि मालिका चर्चेत राहिली आहे. या मालिकेच्या सुरुवातीलाच चित्रीकरणादरम्यान कलाकारांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे हि मालिका चांगलीच चर्चेत आली होती. आता हि मालिका दुसऱ्याच कारणावरून चर्चेत आहे.
मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या प्राजक्ताने आता हि मालिका करण्यास नकार दिला आहे. प्राजक्ताने ही मालिका आता सोडली असून, प्राजक्ता म्हणाली, ‘मला माझ्या सहकलाकाराकडून शिवीगाळ झाल्यानेच ही मालिका मी सोडली आहे. असे देखील प्राजक्ता गायकवाडने स्पष्ट केले आहे.
पण आता आणखी एक मोठा बदल मालिकेत होतो आहे. या मालिकेत आर्या साकारणाऱ्या प्राजक्ता गायकवाडची जागा आता ‘बिग बॉस 2’ फेम अभिनेत्री वीणा जगताप घेत आहे. प्राजक्ताच्या जागी विना मुख्य भूमिकेत दिसणार असल्याचं समोर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- जीव गेला तरी बेहत्तर, पण माफी मागणार नाही – मुनव्वर राणा
- करोडो हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे सोनी टी.व्ही.आणि अमिताभ बच्चन येणार गोत्यात ?
- पंचनाम्याचे दुस-यांदा नाटक कशासाठी..? शेतकऱ्यांना सरसकट मदत करा-भाजपा
- भ्रष्टाचारी एकनाथ खडसेंना आमदार करू नका; दमानिया यांनी घेतली थेट राज्यपालांची भेट
- काँग्रेसला नाराजीचा मोठा धक्का ! ‘हा’ दिग्गज नेता स्थापन करणार नवा पक्ष
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
