Share

आमचं सरकार पाच वर्षे पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणार; प्राजक्त तनपुरेंचा भाजपला टोला

Published On: 

अहमदनगर : २०१९ च्या विधानसभा निकालानंतर सत्तेच्या मतभेदामुळे शिवसेनेनं भाजपच्या महायुतीसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारसरणी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केलं. यानंतर हे सरकार त्यांच्या कृतीमुळेच कोसळेल. आम्हाला सरकार स्थापनेची घाई नाही, अशी टीका भाजप नेत्यांनी अनेकदा केली.

यावर, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भाष्य केलं असून आमचं सरकार हे पाच वर्षे पूर्ण करणार. पाच वर्षे हे सरकार अशा पद्धतीने पूर्ण करेल की पुढील पाच वर्षे देखील पुन्हा आम्हीच सत्तेत येणार असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावला.

दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातून भाजपचे अनेक नेते नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा गौप्यस्फोट राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या रुपाने भाजपला मोठा धक्का बसला आहे. अशातच तनपुरेंच्या गौप्यस्फोटाने राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!