Share

कंगणा रनौतसह तिच्या बहिणीला मुंबई पोलिसांचा दणका!

Published On: 

मुंबई : अभिनेत्री  कंगणा आता अजून एका अडचणीत सापडली आहे.  वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने कंगना रणौत विरोधात एफआयआर  दाखल करण्याचे आदेश दिले होते. कंगना विरोधात दाखल केलेल्या एका याचिकेमध्ये याचिकाकर्त्याने असे म्हटले आहे की, हिंदू कलाकार आणि मुस्लीम कलाकार यांच्यात मतभेद निर्माण करत कंगनाने तिच्या ट्वीट आणि न्यूज चॅनेल्सवरील तिच्या वक्तव्यामधून द्वेष वाढवला आहे. यासंदर्भात आरोप करत याचिका दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणी कंगणाची चौकशी केली जाणार आहे कंगणाचे ट्विटर कोण चालवते? का कंगणा स्वतः ट्विट करते, या बाबत आता चौकशी केली जाणार आहे. कंगणा सोबत  बहिण रंगोली हिची देखील चौकशी केली जाणार आहे.  याआधी देखील शेतकऱ्यांचा अवमान केल्याप्रकरणी कंगणा विरोधात कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल केला गेला.

कंगना रनौत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्याविरोधात वांद्रे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे, दरम्यान याबाबत चौकशीसाठी वांद्रे पोलिसांनी हे समन्स बजावलं आहे. कंगनाला 10 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर रहायचं आहे, तर रंगोलीला 11 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर रहायचं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!