ठाणे: भाजप नेते किरीट सोमय्या (BJP Leader Kirit Somaiya) महाविकास आघाडी सरकारच्या हात धुवून मागे लागले असल्याचे दिसत आहे. पुण्यातील जंबो कोविड सेंटरमध्ये (Pune Jambo Covid Centre) घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) तसेच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर केला आहे.
किरीट सोमय्या आज ठाणे येथील नगरसेवक संजय वाघुले यांच्या दादा पाटील वाडी इथल्या जनसंपर्क कार्यालयात गेले होते. यावेळी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मला काय रुग्णालयात टाकणारे तुमचे संजय राऊत आणि अनिल परब किती तारखेला जेलमध्ये जाणार हे सांगा, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला.
पुढे बोलताना किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टोलेबाजी केली आहे. संजय राऊत यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात किती खर्च केला, असा प्रश्न सोमय्या यांनी विचारला. या ठाकरे सरकारमध्ये उत्तर देण्याची हिम्मत नाही, अशी टीका देखील किरीट सोमय्या यांनी केली आहे. मी जे कागद पत्र दिले ते चुकीचे आहे का? चुकीचे असतील तर मला पोलिसांनी अटक करावी, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- IPL Auction 2022 : चेन्नईने नाकारल्यानंतर फाफ डुप्लेसिसने शेअर केला भावूक व्हिडिओ; म्हणाला..
- “अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर माझे वडील… ”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य
- पंजाब निवडणूक प्रचार दौऱ्यात प्रियांका गांधींची आम आदमी पक्षावर सडकून टीका, म्हणाल्या…
- उत्पल पर्रीकरांनी अपक्ष निवडणूक लढवल्याबद्दल फडणवीसांनी व्यक्त केली खंत; म्हणाले…
- IPL AUCTION 2022: अरे ‘बावा’! अंडर १९चा स्टार पंजाबमध्ये गेला कोटीत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

