🕒 1 min read
बंगळुरू : भारतीय अंडर १९ संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू राजवर्धन हंगरगेकरला मेगा ऑक्शनच्या दुसऱ्या दिवशी चेन्नई सुपर किंग्सने १.५ कोटी रुपयांना खरेदी केले आहे. CSK ने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स बरोबरच्या बोली युद्धानंतर राजवर्धनला संघात घेतले. तो फास्ट बॉलर आणि पिंच हिटर देखील आहे.
राजवर्धनची बेस प्राईस ३० लाख रुपये होती, त्याने नुकत्याच संपलेल्या अंडर-१९ विश्वचषक २०२२ मध्ये अव्वल फॉर्मचे प्रदर्शन केले. प्रतिष्ठेच्या स्पर्धेत, हंगरगेकर याने भारतासाठी गोलंदाजी आक्रमणाची सुरुवात केली. भारताने अंडर १९ स्पर्धेचे जेतेपदही मिळवले आहे. महाराष्ट्राच्या राजने भारताच्या अंडर १९ संघाकडून खेळलेल्या पाच सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या. त्याशिवाय, आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात त्याने तीन सिक्सर ठोकून ३७ नाबाद धावा केल्या.
राजवर्धन हंगरगेकरने जानेवारी २०२१ मध्ये २०२०-२१ सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी ट्वेंटी २० मध्ये पदार्पण केले. फेब्रुवारी २०२१ मध्ये लिस्ट ए क्रिकेटमध्ये महाराष्ट्रासाठी २०२०-२१ मध्ये राजला विजय हजारे ट्रॉफीमध्ये स्थान देण्यात आले होते. आता हा युवा खेळाडू आयपीएलमध्ये अनुभवी महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारमध्ये उत्तर देण्याची हिम्मत नाही’; किरीट सोमय्यांची टीका
- उदयन राजे यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर सिद्धार्थ जाधव देखील खुश, म्हणाला…
- IPL AUCTION 2022: अंडर १९ संघातील सर्वात महाग खेळाडू ठरला ‘यश दयाल’ ; जाणून घ्या कोण आहे तो?
- IPL Auction 2022 : चेन्नईने नाकारल्यानंतर फाफ डुप्लेसिसने शेअर केला भावूक व्हिडिओ; म्हणाला..
- “अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर माझे वडील… ”, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
