सातारा : उदयन राजे नेहमीच आपल्या हटके स्टाईल मुळे ओळखले जातात. कधी कधी भर सभेत आक्रमक पणा तरी कधी हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध डायलॉग यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलमुळे ते अनेक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. उदयन राजे यांची कॉलर उडवायची पद्धत राज्यात अनेक जण अंगिकारतात, लोकांना उदयन राजे यांच्यासारखी कॉलर उडवायला आवडते देखील.
अशीच पुन्हा एकदा त्यांनी आज आपल्या शर्टची कॉलर उडवली आणि जमलेल्या चाहत्यांची इच्छा पूर्ण केली. यावेळी मराठी चित्रपट सृष्टीमधला विनोदी अभिनेता सिदार्थ जाधव देखील यावेळी उपस्थित होता. उदयन राजे यांचा लोकांमध्ये असताना कॉलर उडवायचा अंदाज भरपूर लोकांना आवडतो. आज त्यांनी अशीच कॉलर मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव समोर उडवली. उदयन राजे एका सार्वजनिक कार्यक्रमात गेले असताना तिथे उपस्थित लोकांनी त्यांना कॉलर उडवायची विनंती केली, या विनंतीला मान देऊन उदयन राजे यांनी त्यांच्या शर्टची कॉलर भर कार्यक्रमात उडवली. हे बघून तिथे उपस्थित असललेला सिद्धार्थ जाधव देखील आनंदित झाला.
याआधी उदयन राजे पुष्पा चित्रपटातील पेहरावामुळे चर्चेत आले होते. काहीच दिवसांपूर्वी उदयन राजे हे थेट लुंगी घालून सार्वजनिक ठिकाणी अवतरले होते. त्यांनी पुष्पा चित्रपटातील एका गाण्यावर ठेका देखील धरला होता.
महत्वाच्या बातम्या :
- “अरुण गवळीच्या दारुच्या अड्ड्यावर माझे वडील… “, जितेंद्र आव्हाडांचे मोठे वक्तव्य
- IPL Auction 2022 : स्पर्धेत खेळणार नसला तरी, ‘हा’ खेळाडू गेला कोटींच्या घरात
- पंजाब निवडणूक प्रचार दौऱ्यात प्रियांका गांधींची आम आदमी पक्षावर सडकून टीका, म्हणाल्या…
- काँग्रेसला पर्रीकरांवर बोलण्याचा अधिकार आहे का?- देवेंद्र फडणवीस
- IPL Auction 2022 : १९ वर्षीय खेळाडूवर मुंबईचा करोडोचा ‘तिलक’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

