नवी दिल्ली: लोकसभेत सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर सध्या चर्चा सत्र सुरू आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सभागृहाला आणि देशाला उद्देशून भाषण करत आहेत. यावेळी बोलताना देशात कोरोना विषाणू पासरवण्यासाठी कॉंग्रेस जबाबदार असल्याचा आरोप देखील मोदींनी लावला आहे. यावर राज्यातील कॉंग्रेस नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे.
महाराष्ट्रातील मजुरांना काँग्रेसने (Congress) स्थलांतर करण्यास भाग पाडले. त्यासाठी त्यांना मोफत तिकिटे दिली, असा आरोप मोदींनी केला. या त्यांच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील भाजप विरोधी नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, ज्या महाराष्ट्राने भाजप युतीसोबत केंद्राला १८ खासदार दिले, त्यांच्या मागे महाराष्ट्रातील मतदारांचा मोठा वाटा आहे. त्या सर्वांचा नरेंद्र मोदींनी मोठा अपमान केला आहे. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच त्यांनी महाराष्ट्राला कितीही बदनाम करण्याचे ठरविले तरी महाराष्ट्र दिल्लीसामोर झुकणार नाही असेही त्या म्हणाल्या.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी यावरून पुन्हा महाविकास आगाडीवर निशाणा साधला आहे. पंतप्रधानांना महाराष्ट्राचा सन्मान नसता तर पालखी मार्ग, समृद्धी महामार्ग ही कामे झाली नसती. महाराष्ट्राचा अपमान होईल असा शब्द पंतप्रधानांच्या भाषणात नव्हता. तसं असतं तर आम्ही लोकसभेत विरोध केला असता. सुप्रियाताई माझ्यापेक्षा सिनियर आहेत. मी त्यांचा आदर करतो पण त्यांनी मोदींच्या भाषणबाबत आहे हैराण होण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
गोव्याच्या राजकारणाबद्दल काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी..
UP Election: संविधान वाचवायचे असेल तर… प्रकाश आंबेडकरांचे मतदारांना आवाहन
‘कोरोनाच्या काळात तुम्ही कुठे होतात?’; चंद्रकांत पाटलांनी साधला कॉंग्रेसवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

