Share

“…मग त्यांनी चुली पेटवायच्या का?”, महेश तपासे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

Published On: 

मुंबई : दिवसेंदिवस वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. असे असतांनाच आता घरगुती सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. ७ मे रोजी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

यासंदर्भात महेश तपासे यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की,‘गॅस सिलेंडरची किंमत आज हजाराच्या घरात पोहोचली. सर्वसामान्य जनतेला पुन्हा स्टोव्हकडे वळण्याचीही मुभा नाही कारण रॉकेलही महाग, मग त्यांनी चुली पेटवायच्या का? पण लाकूडफाटा तरी कुठे परवडतो आता? देशातल्या जनतेवर उपासमारीची वेळ आल्यावरच जाग येणार का केंद्र सरकारला?’, असा खोचक सवालही तपासे यांनी केला आहे.

दरम्यान, यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरून महेश तपासे यांनी मोदी सरकारवर टीका केली होती. ते म्हणाले होते की,‘गेल्या १६ दिवसांत देशामध्ये १४ वेळा पेट्रोल-डिझेलची दरवाढ झालेली आहे. “अच्छे दिन”चे स्वप्न दाखवणारे मोदी सरकार महागाईला रोखण्यात अकार्यक्षम ठरलेले आहे. एकीकडे गेल्या २ वर्षांपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन सुरु असताना सर्व उद्योग व्यवसाय बंद होते. ज्यामुळे लोकांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली. अशातच रशिया-युक्रेनचे युद्धही सुरु झाले. आणि अशा गंभीर परिस्थितीमध्ये पेट्रोल-डिझेलची दरवाढ केल्यामुळे देशातील एकूण महागाई वाढली, याचे केंद्र सरकारला भान राहिलेले नाही. ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी होती, त्यावेळेस सुद्धा मोदी सरकार देशाच्या जनतेला कोणत्याही प्रकारचा दिलासा देऊ शकलेले नाही.’

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!