Share

VIDEO : आता फक्त मोजत राहायचं..! पाकिस्तानच्या आफ्रिदीला षटकार खेचत चेतेश्वर पुजारानं ठोकलं सलग चौथं शतक

Published On: 

मुंबई : भारतीय कसोटी क्रिकेट संघातून वगळलेल्या चेतेश्वर पुजाराची (cheteshwar pujara) बॅट काऊंटी क्रिकेटमध्ये (england county championship) जोरदार तळपते आहे. या मोसमात ससेक्सकडून खेळणाऱ्या पुजाराने चौथ्या सामन्यात चौथे शतक झळकावले. पुजाराचे या मोसमातील चौथे शतक मिडलसेक्सविरुद्ध ठोकले आहे. त्याने या मोसमात ससेक्ससाठी यापूर्वीच दोन द्विशतकेठोकली आहेत. पुजारामुळे प्रभावित झालेल्या ससेक्सने त्यांच्या सोशल मीडियावर हे शतक साजरे केले. त्याच्या शतकादरम्यान पुजाराने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीच्या वेगवान चेंडूवर अप्पर कटच्या सहाय्याने षटकार ठोकला.

पुजारा इंग्लंडच्या काऊंटी चॅम्पियनशिपच्या डिविजन दोनमध्ये ससेक्सकडून खेळत आहे. या क्लबसाठी तो आतापर्यंत ४ सामन्यात फलंदाजीसाठी उतरला असून प्रत्येक सामन्यात त्याने शतक झळकावले आहे. एक दिवस आधी त्याने मिडलसेक्सविरुद्ध दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले होते. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येताना पुजाराने आपल्या शैलीविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली आणि काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये १३३ चेंडूत सलग चौथे शतक झळकावले.

यादरम्यान त्याने पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीविरुद्ध काही शानदार शॉट्सही खेळले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पुजाराने १४९ चेंडूत १२५ धावा केल्या होत्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्या शतकाच्या जोरावर ससेक्सनेही मिडलसेक्सवर २७० धावांची आघाडी घेतली.

महत्त्वाच्या बातम्या –

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!