नाशिक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर मोठा वाद निर्माण झाल्याचं काल पाहायला मिळाले. काल राणे यांना अटक देखील करण्यात आली होती. यानंतर महाड येथील कोर्टाने काल जामीन मंजूर केला. दरम्यान, जामीन मिळाला असला तरीही राणेंच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे कारण आता नाशिक पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून २ सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
दरम्यान, कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा दिवस. सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. त्यामध्ये नारायण राणेंच्या विरोधात तसेच समर्थनार्थ आंदोलन करण्यात आल्याचं काल पाहायला मिळाले.
दरम्यान, नाशिक शहरातील शिवसेना भाजप राडा प्रकरणी दिवसभरात 130 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजप कार्यालय फोडल्या प्रकरणी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांसह जवळपास 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या कार्यालयावर चाल करून गेल्या प्रकरणी भाजप नगरसेवक मुकेश शहाणेसह जवळपास 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दोन वर्षांपूर्वीच मी शेतकरी झाले’; प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद
- मनपाच्या आदेशाला खो देणाऱ्या रुग्णालयांना आता स्मरण पत्र
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
- राणेंच्या घराबाहेर वरुण सरदेसाईंची पोलिसांना अश्लिल शिवीगाळ, मनसेकडून व्हिडिओ पोस्ट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
