Share

‘दोन वर्षांपूर्वीच मी शेतकरी झाले’; प्रीती झिंटाने व्यक्त केला आनंद

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड सेलिब्रिटी यांचे घर हे अलिशान असते. त्यांच्या घरामध्ये त्यांना सगळ्याच सोई सुविधा उपलब्ध असतात. मात्र अभिनेत्री प्रिती झिंटाच्या अलिशान घरात शेती असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. तिच्या घरात भाज्यांपासुन ते फळांपर्यत सर्वकाही तिथेच तयार होतं. सध्या अनेक लोक छोटी शेती करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच तिने च्या फार्महाउसमधील सफरचंदाच्या बागेतील व्हिडीओ  शेअर केला आहे.

प्रिती अनेकदा तिच्या सुंदर बागेतील फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुन्हा एकदा तिने सफरचंदाच्या बागेचा फोटो शेअर केला आहे. तिच्या बागेतील सफरचंद पाहून तिला खूप आनंद झाला असल्याचे देखील तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे.  तसेच हा व्हिडीओ शेअर करत ‘मी आता शेतकरी झाले आहे. मी इथे येत राहिल’, असं म्हंटलं आहे.

https://www.instagram.com/p/CS8vSHyDbEo/?utm_source=ig_web_copy_link

सध्या प्रीती हिमाचल प्रदेशमध्ये असून ही पोस्ट शेअर करत तिने तिच्या जुन्या आठवणीना उजाळा दिला आहे.  तसेच पुढे ती पोस्ट शेअर करत लिहिते की, सफरचंद तोडणं, लहान आणि मोठ्या आकाराचे सफरचंद वेगवेगळे करणं यासोबतच सफरचंदाचा ज्यूस बनवणं ही सगळी आवडती कामं होती.

तर पुढे म्हणते की, दोन वर्षांपूर्वीच मी अधिकृतरित्या शेतकरी झाले आहे. मला हिमाचल प्रदेशच्या सफरचंद शेतकरी गटाचा भाग झाल्याचा आनंद आहे’, असं म्हणते तिने आनंद व्यक्त केला आहे.

मागील लॉकडाउनमध्ये तिने सिमला मिरची, टोमॅटो अश्या फळभाज्या घरीच पिकवल्या आहेत. याचे व्हिडीओ ती नेहमी चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिचे हे काम पाहून अनेकजण सोशल मिडियावर तिचे कौतुक करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!