Share

हॉटेल ताजमधून गोळीबारासारखा आवाज येतोय, फोर्स पाठवा…

Published On: 

औरंगाबाद – बीट मार्शल रिपोर्टिंग, कंट्रोल रूम, हॉटेल विवांता ताजमधून गोळीबारासारखा आवाज येतोय, तत्काळ फोर्स पाठवा. शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास पोलीस आयुक्तालयातील कंट्रोल रूमला बीट मार्शल कर्मचाऱ्याचा कॉल प्राप्त झाला. त्यामुळे कंट्रोल रूमने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करत क्यूआरटीला अलर्ट करून तत्काळ रवाना होण्यास सांगितले.

पाहता पाहता हॉटेल ताजमध्ये अद्ययावत शस्त्रसाहित्यासह क्यूआरटीने हॉटेलचा ताबा घेतला. बंदूकधारी अतिरेक्यांना लक्ष्य केले गेले. जखमींना बाहेर काढले जात होते. नेमके काय सुरू आहे हे मात्र इतरांना कळेना. अर्धा तास चाललेल्या नाट्यानंतर हे मॉक ड्रिल असल्याचे समजले अन् इतरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशभरात अलर्ट घोषित केला आहे. शहरातही परदेशी पर्यटकांची वर्दळ, ऐतिहासिक स्थळामुळे अधिक सतर्क राहण्याच्या सूचना आाहेत. त्यामुळे कुठल्याही घटनेसाठी शहर पोलीस तयार आहेत काय, घटना कळाल्यानंतर ते किती वेळात पोहोचतात तसेच त्यांची सक्षमता, सतर्कता तपासण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात आला. याची कल्पना मोजक्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली होती. यात शहर क्यूआरटी 20 मिनिटांत, तर ग्रामीण क्यूआरटी अर्ध्या तासात घटनास्थळी दाखल झाले.

250 पेक्षा अधिक जवान दाखल
दुपारी 1 वाजता सुमारे 250 पेक्षा अधिक जवान हॉटेलमध्ये दाखल झाले. हॉटेलचा ताबा घेत खोलीत बंदूकधारी तरुणांना रोखले आणि बाहेर आणले. यात कोणी जखमी झाले तर त्यांना कसे बाहेर काढावे, रुग्णालयात कसे न्यावे, अशी घटना घडल्यानंतर शहरातील वाहतूक नियोजन कसे असावे, इतर महत्त्वाच्या ठिकाणांवर स्थानिक पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ताबा कसा घ्यावा याचे परीक्षण करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!