मुंबई : महाराष्ट्रातील भंडारा जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी रात्री उशिरा नवजात बालकांच्या दक्षता विभागाला लागलेल्या आगीत होरपळून १० बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नवजात बालकांचं वय हे अवघ्या काही दिवसांपासून ते 3 महिन्यांपर्यंतचं होतं. वार्डमध्ये एकूण १७ बालकं होती त्यातील सात बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. परंतु, १० बालकांचे प्राण मात्र वाचवले जाऊ शकले नाहीत. या हृदयद्रावक घटनेनंतर संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यू झालेल्या बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. ही मदत अत्यल्प असून त्यात वाढ करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
ते म्हणाले, ‘भंडारा जिल्हा रुग्णालयात नवजात शिशु युनिटला आग लागून झालेल्या दुर्घटनेत 10 नवजात बालकांचा मृत्यु झाल्याची मन हेलावणारी दुःखद घटना घडली. या प्रकरणी राज्य शासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत अत्यल्प असून त्यात वाढ करून 10 लाख रुपयांची सांत्वनपर आर्थिक मदत या दुर्घटनेत दगावलेक्या नवजात बालकांच्या कुटुंबियांना करावी.’
तसंच, ‘भंडारा जिल्हा रुग्णालय दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. राज्यात पुन्हा अशी घटना घडू नये यासाठी सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नवजात अर्भकांच्या पालकांना मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून किमान 10 लाख रुपयांची त्वरित सांत्वनपर आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अमृता फडणवीस यांच्याही सुरक्षेत कपात; वाय दर्जा ऐवजी मिळणार ‘ही’ सुरक्षा
- राज्य एकदम सुरक्षित आहे म्हणून सुरक्षा काढली; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला टोला
- हात जोडून उभं राहण्याशिवाय माझ्याकडे कोणतेही शब्द नव्हते – उद्धव ठाकरे
- हॉटेल ताजमधून गोळीबारासारखा आवाज येतोय, फोर्स पाठवा…
- मुंबई महापालिकेच्या नोटिशीप्रकरणी सोनू सूदची उच्च न्यायालयात धाव !


