Share

‘माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकले तरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीयेत’

Published On: 

मुंबई : राज्यासह देशभरात पुन्हा एकदा कोरोना रोगाने थैमान घातले आहे. दरम्यान, राज्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे. यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी व आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी योग्य वेळ मिळावा यासाठी राज्यात कडक निर्बंधांसह टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांना मोठा फटका बसत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दीड हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली असली तरी ती अतिशय तुटपुंजी आहे. यासोबतच ती मदत कशी मिळणार याबाबत अजूनही स्पष्टता नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. आता शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा लढवलेले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगार बोंबलून बोंबलून थकलो तरी आमची मागणी पूर्ण होत नसल्याने यात शंभर टक्के राजकारण होत आहे. माथाडी कामगार हे सर्वपक्षीय असल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घेतला पाहिजे, अशी मागणी देखील नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

यासोबतच, मुख्यमंत्र्यांना वारंवार सांगून देखील ते गांभीर्याने घेत नसल्याने भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या चारही पक्षांच्या प्रदेश अध्यक्षांना आणि माथाडी बोर्डाचे ३६ चेअरमन यांना पत्र व्यवहार केला असल्याचे नरेंद्र पाटील यांनी सांगितलं. माथाडी व बाजार समितीमध्ये काम करणाऱ्या घटकांना अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट करावे. रेल्वे, परिवहन बस व रक्षा कवच यामध्ये समाविष्ट करावे, अशी मागणी देखील नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!