औरंगाबाद: महाराष्ट्रात रेमडेसिविरवरुन सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडतांना दिसत नाही. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. सतिश चव्हाण यांनी ट्विट करत विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील जनतेली बेगडी प्रेम न दाखवता नेमके रेमडेसिविर कुठे अडले याचा शोध घेण्याचा सल्ला दिला आहे.
देशभरातून रेमदडेसिविर इंजेक्शनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असली तरी हे इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांचे उत्पादन वाढत नाही त्यामुळे महाराष्ट्रच नाही तर देशभरातल्या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र वस्तुस्थिती समोर न आणता सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण करण्यात मग्न आहे.
महाराष्ट्राला केंद्र सरकारने कमी रेमडेसिविरचा साठा दिल्याबद्दल राज्यात टीकेची झोड उठली. त्यामुळे केंद्र सरकारने २१ ते ३० एप्रिल या दहा दिवसांसाठी राज्याला ४ लाख ३५ हजार रेमडेसिविर देण्याचे जाहीर केले होते. मात्र प्रत्यक्षात तसे न झाल्याने आ. सतिश चव्हाण यांनी केंद्र सरकारवक टिकेची तोफ डागली आहे.
यात त्यांनी म्हटले आहे, राज्यातील विरोधी पक्षनेत्यांनी रेमडेसिविरची आकडेवारी जाहीर करून केंद्राने महाराष्ट्राला जास्तीचे रेमडेसिविर कसे दिले हे सांगून नेहमीप्रमाणे याचा देखील ढोल वाजवून घेतला. परंतु महाराष्ट्रात सक्रीय रुग्णांची संख्या जास्त आहे हे सांगायला ते साफ विसरले आहेत. २१ ते २५ एप्रिल या पाच दिवसात राज्याला फक्त १,१३,६३८ रेमडेसिविर मिळाले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांनी राज्यातील जनतेला हे असले बेगडी प्रेम न दाखवता रेमडेसिविर नेमके कुठे अडले याचा शोध घ्यावा असा सल्लाच त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदीजी पाहा! बैठकीत मास्क न घातल्याने थायलंडच्या पंतप्रधानांना १४ हजारांचा दंड
- घाटीत निवासी महिला डॉक्टरला मारहाण करणारा गजाआड
- परमबीर सिंह गोत्यात ? अंडरवर्ल्डशी संबंध ते सोन्याची बिस्किटे, पोलीस अधिकाऱ्यांनीच केले गंभीर आरोप
- प्रेम विरहातून युवकाची रेल्वे समोर आत्महत्या
- ‘हमने तो जलने का हुनर भी तुफानों से सीखा है’, आनंद महिंद्रांची कोरोना योद्ध्यांना अनोखी सलामी


