🕒 1 min read
मुंबई : काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना लखीमपूर येथे जाण्यापासून उत्तर प्रदेशातील पोलिसांनी रोखलं आहे. त्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात तालिबानी राज सुरू आहे. पीडित कुटुंबांना भेटणं भाजपच्या राज्यात गुन्हा आहे का?; असा संतप्त सवाल नाना पटोले यांनी केला आहे. तसेच प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेचाही नाना पटोले यांनी निषेध केला.
नरेंद्र मोदींचं आणि उत्तर प्रदेशचं सरकार बरखास्त करावं. शेतकरी आज या देशाचा मूळ असताना या शेतकऱ्यांची विटंबना करण्याचा अधिकार या भाजपच्या विचाराला दिला गेलेला नाही. या मूळाला संपवण्याचा प्रयत्न भाजपने केला असेल तर निश्चितपण केंद्रातील आणि उत्तर प्रदेशमधील सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसकडून केली जाणार, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतकऱ्यांना चिरडले. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी अजयसिंह बिष्ट यांचे सरकार आटापिटा करत आहे. झालेल्या घटनेचा निषेझ करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी काँग्रेसकडून शेतकऱ्यांबरोबर आंदोलन करण्याच्या सूचना काँग्रेस कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. या कारवाया तातडीने झाल्या नाही तर वेळप्रसंगी महाराष्ट्र बंदची हाकही आम्ही देऊ, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘गांधी हत्येनंतर मिठाई वाटणा-या लोकांना महात्मा गांधी यांच्याच नावाचा आसरा घ्यावा लागतो
- युपीला भेट देण्यासाठी आता व्हिसाची गरज आहे काय? ‘त्या’ घटनेवरून भूपेश बघेलांचा संतप्त सवाल
- ‘काळजी करू नका, तुम्हाला मदत मिळवून देणारच’, फडणवीसांची शेतकऱ्यांना ग्वाही
- शाळेच्या पहिल्या दिवशी लगेच अभ्यास नको; वर्षा गायकवाड पोहचल्या शाळेत
- ‘आपले सरकार आले तरी मोदीसरकार विरोधातील लढाई अजून संपलेली नाही’

