Share

पंतप्रधान मोदी आतापर्यंतचे सर्वाधिक गोंधळलेले पंतप्रधान; ‘राष्ट्रवादी’ची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पंतप्रधान मोदी हे गोंधळलेले पंतप्रधान आहेत अशी जनतेची धारणा होऊ लागली आहे. अनेक मोठ्या योजना आणि धोरणे आणण्याचा उत्साह केंद्र सरकार दाखवत असले तरी प्रत्यक्षात ठोस कृतिशील आखणी नसल्याने अनेकदा या योजनांमध्ये बदल करावे लागले तर अनेक योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसने केली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट करण्यात आली आहे.

मोदी सरकार सत्तेत येऊन आठ वर्ष झाली आहेत. या आठ वर्षात मोदी सरकारने आणलेल्या सर्व मोठ्या योजना सपशेल अपयशी ठरल्या आहेत. CAA, कृषी कायदे आणि आता अग्निपथ योजनेच्या विरोधात देशभर हिंसक आंदोलने होत आहेत. शेतकऱ्यांचे आंदोलन वर्षभर चालले. ७०० हून अधिक शेतकरी यामध्ये मृत्यूमुखी पडले. आता अग्निपथ योजना लादून मोदी सरकार युवकांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करत आहे का? असा संतप्त सवालही राष्ट्रवादीने केला आहे.

जनतेचा रोष असाच वाढत राहिल्यास ज्याप्रमाणे या देशाने मोदींची एकही मोठी योजना स्वीकारली नाही, त्याप्रमाणे आता २०२४ ला देशाची जनता मोदींना देखील स्वीकारणार नाही. देशातील वाढत्या महागाईचे नवनवे झटके सर्वसामान्यांना सध्या बसत आहेत. जोर का झटका धीरे से देण्याचे तंत्र केंद्र सरकारने जाणीवपूर्वक अवलंबले आहे. त्यामुळे ठराविक दिवसांच्या अंतराने विविध गोष्टींची दरवाढ होताना दिसते. असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!