मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील चौथा टी-२० सामना राजकोटमधील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला ८२ धावांनी पराभव करत मालिकेत २-२ अशी बरोबरी साधली. आता रविवारी होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात दोन्ही संघ मालिका जिंकन्याच्या इराद्यानं मैदानात उतरतील. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघाने मालिकेत पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सामना जिंकून मालिका बरोबरीत साधली.
भारताची खराब सुरुवात
नाणेफेक गमावल्यानंतर भारत प्रथम फलंदाजी करण्यास मैदानात उतरला. भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड वैयक्तिक ५ धावांवर बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या केवळ १३ धावा होती. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला श्रेयस अय्यर अवघ्या ४ धावा करून बाद झाला. एका वेळी भारताची धावसंख्या ८१ धावांवर ४ बाद होती. दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याच्या धारदार खेळीमुळे भारताला चांगल्या धावसंख्येकडे जाता आले. कार्तिकने २७ चेंडूत ५५ तर हार्दिकने ३१ चेंडूत ४६ धावा केल्या. दोघांनी पाचव्या विकेटसाठी ६५ धावा जोडल्या. एका क्षणी भारताची धावसंख्या १५० धावांपर्यंत पोहोचवणेही अवघड जात होते. पण कार्तिकच्या स्फोटक खेळीमुळे भारताने २० षटकात ६ बाद १६९ धावा उभारल्या.
???????? India's first T20I
???????? Nidahas trophy final
???????? Must-win 4th game trailing 2-1Dinesh Karthik wins his third T20I Player of the Match award, 16 years after his first ???? ???????? pic.twitter.com/6og87bQEHc
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 17, 2022
आफ्रिकेची निराशा
प्रत्युत्तरात आफ्रिकेच्या फलंदाजांनी निराशा केली. भारताकडून आवेश खानने अप्रतिम गोलंदाजी करत आफ्रिकेच्या ४ फलंदाजांना बाद केले. याशिवाय युझवेंद्र चहलनेही २ बळी घेतले. भारताच्या १६९ धावांना प्रत्युत्तर देताना आफ्रिकेने २४ धावांवर पहिली विकेट गमावली. क्विटंन डी कॉक पाचव्या षटकात १४ धावा काढून बाद झाला. आफ्रिकेचा एकही फलंदाज मोठा धावा करू शकला नाही आणि विकेट गमावत राहिला. आफ्रिकेचा संघ १६.५ षटकांत ९ गडी गमावून ८७ धावा करू शकला. रिटायर्ड हर्ट झाल्याने कर्णधार बावुमा फलंदाजीला आला नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

