पाटणा : बिहारमधील लोकजनशक्ती पार्टीत सध्या जोरदार घमासान सुरू आहे. असून पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंड पुकारून करून त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली. तसेच चिराग पासवान यांना अध्यक्षपदावरूनही हटवले. यानंतर आता एका राष्ट्रीय वृत्तपत्राशी संवाद साधताना त्यांनी ‘संकटात असताना भाजपने मला एकटे सोडल्याचे’ खंत व्यक्त केली.
२०२० सालच्या विधानसभा निवडणूक प्रचारावेळी चिराग पासवान यांनी स्वत:ला ‘मोदींचा हनुमान’ म्हटले होते. पण आता पासवान यांनी मोदींवर नाराजी दाखवली आहे. ‘भाजपने माझी साथ सोडली आहे असे मला वाटते. भाजपमधल्या कोणीही माझ्याशी संपर्क साधलेला नाही. जेव्हा कोणीही भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाला पाठिंबा देत नव्हते, कोणीही नरेंद्र मोदींचे समर्थन करत नव्हतं, त्यावेळी मी आणि माझे वडील रामविलास पासवान त्यांच्यासोबत उभे होतो. जेव्हा नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडली, तेव्हादेखील माझे वडील ठामपणे भाजपसोबत होते. राम मंदिर, कलम ३७०, सीएए, तिहेरी तलाक या सगळ्या मुद्द्यांवर आम्ही भाजप आणि मोदींच्यासोबत होतो,’ याची आठवण चिराग पासवान यांनी करून दिली.
लढाई शेवटपर्यंत लढणार
मी बिहारमध्ये माझ्या लोकांमध्ये परतणार आहे. मला आता त्यांच्याच आशिर्वादाची गरज आहे. तसेच ही लढाई आपण शेवटपर्यंत लढण्यासाठी तयार असल्याचेही चिराग पासवान म्हणाले. माझ्या वडिलांनी उभ्या केलेल्या पक्षाचा आपण त्याग करू शकत नसल्याचेही ते म्हणाले.
५ जुलैपासून आशीर्वाद यात्रा
लोकजनशक्ती पक्षात नुकतीच फूट पडली असून चिराग पासवान यांची फुटीर गटाकडून अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. चिराग यांनीही बंड केलेल्या ५ खासदारांना पक्षातून काढून टाकलेले आहे. त्यामुळे कोणता गट खरा लोकजनशक्ती पक्ष आहे, याचा निर्णय आता निवडणूक आयोगाला करावा लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ही आशीर्वाद यात्रा होत आहे. यात्रेची सुरुवात रामविलास पासवान यांचा जन्मदिन म्हणजे पाच जुलैपासून होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारकडून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल
- ‘महाविकास आघाडी सरकार आहे की तमाशा?’, फडणवीसांना संताप अनावर
- ‘हिंसाचार प्रकरणाचा तपास आयोगच करणार’, हायकोर्टाने ममता सरकारला फटकारले
- ‘७० टक्के लसीकरणानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका’, ग्रामविकासमंत्र्यांची माहिती
- नुसरत जहां यांच्या लग्नाचा वाद संसदेत! भाजपने केली ‘ही’ मागणी


