मुंबई : राज्य सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे.
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन पुकारले आहे. संभाजीराजे यांनी राज्य सरकारकडे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर राज्य सरकारकडून याचिका दाखल करण्यात आली आहे.
माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्शर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे.
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) June 22, 2021
मराठा आरक्षणाबाबत आम्ही शासनाकडे पुनर्विचार याचिका दाखल करण्याची प्रमुख मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली असून, आज सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनातर्फे ही याचिका दाखल करण्यात आली. माझ्या मागणीनुसार या याचिकेमध्ये गायकवाड आयोगाच्या अहवालातील उर्वरीत अॅनेक्शर्स देखील भाषांतरीत करण्यात येतील, असे नमूद केले आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली.
महिनाभरासाठी मूक आंदोलन स्थगित
राज्य सरकारने प्रशासकीय कामे करण्यासाठी आमच्याकडे २१ दिवसांचा वेळ मागितला असून त्यासाठी आम्ही पुढील महिनाभरासाठी मूक आंदोलन स्थगित करत आहोत, अशी घोषणा खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. जर येत्या महिन्याभरात आम्हाला अपेक्षित परिणा दिसले नाहीत, तर आम्ही आमचे आंदोलन अधिक तीव्र करू, असेही खासदार संभाजीराजे यांनी काल सोमवारी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडी सरकार आहे की तमाशा?’, फडणवीसांना संताप अनावर
- ‘हिंसाचार प्रकरणाचा तपास आयोगच करणार’, हायकोर्टाने ममता सरकारला फटकारले
- ‘७० टक्के लसीकरणानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका’, ग्रामविकासमंत्र्यांची माहिती
- नुसरत जहां यांच्या लग्नाचा वाद संसदेत! भाजपने केली ‘ही’ मागणी
- ‘काश्मीरवर तोडगा निघाल्यास अण्वस्त्रांची गरजच नाही’, पाक पंतप्रधानांचा भारताला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

