कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचार प्रकरणात कोलकाता उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या सरकारला फटकारले. न्यायालयाने सरकारच्या याचिकेला फेटाळताना या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय मानवी हक्क आयोग करेल, असे स्पष्ट केले. त्याचबरोबर आयोगाला एका समितीची स्थापना करण्याचेही निर्देश दिले.
ही समिती हिंसाचारामुळे स्थलांतरित झालेल्या लोकांचा तपास करेल. कार्यवाहक मुख्य न्यायाधीश राजेश बिंदल यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायाधीशांच्या पीठाने राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी केली. त्यात ममता बॅनर्जी सरकारने निवडणुकीनंतर हिंसाचाराचा तपास एनएचआरसीकडे सोपवण्यासंबंधी आदेश मागे घेण्याची मागणी केली होती. हा आदेश काही दिवसांपूर्वी उच्च न्यायालयानेच दिला होता.
राज्याला त्यांच्या मर्जीनुसार वागता येणार नाही
कोर्टाने सरकारच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान आदेशाचा पुनरुच्चार केला. राज्य सरकारने निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात उपाययोजनाबाबत काही ठोस निर्णय घेतला नाही. निवडणुकीनंतरच्या हिंसाचारामुळे राज्यातील लोकांचे जीवित व संपत्तीला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत राज्याला त्यांच्या मर्जीनुसार वागता येणार नाही. अशा तक्रारींवर तत्काळ कारवाईची गरज आहे.
हिंसाचाराने लोकशाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण
राज्यपाल जगदीप धनखड यांनी राज्यातील हिंसाचारावर चिंता व्यक्त केली. परिस्थिती खूप धोकादायक आहे. हिंसाचाराने लोकशाहीच्या ढाच्यावर प्रश्नचिन्ह लावले आहे. दरम्यान, खटल्याची पुढील सुनावणी आता ३० जून रोजी होणार आहे. हायकोर्टाने राज्य सरकारला एनएचआरसीच्या तपासात कोणत्याही स्वरूपाचा अडथळा आणला जाऊ नये, अन्यथा सरकारच्या विरोधात अवमाननेची कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. हिंसाचारामुळे शेकडो लोकांवर स्थलांतरित होण्याची वेळ आल्याच्या प्रकरणांना न्यायालयाने प्राधान्य दिले आहे. स्थलांतरित लोक भीतीमुळे घरी परतू शकत नाहीत.
महत्वाच्या बातम्या
- ‘७० टक्के लसीकरणानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका’, ग्रामविकासमंत्र्यांची माहिती
- नुसरत जहां यांच्या लग्नाचा वाद संसदेत! भाजपने केली ‘ही’ मागणी
- ‘काश्मीरवर तोडगा निघाल्यास अण्वस्त्रांची गरजच नाही’, पाक पंतप्रधानांचा भारताला इशारा
- ‘बावनकुळेंचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची गरज नाही’, विनायक राऊतांचा टोला
- ‘पवारांच्या पे रोलवर राहून बाजू घेण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकांच्या व्यथा मांडा’


