Share

नुसरत जहां यांच्या लग्नाचा वाद संसदेत! भाजपने केली ‘ही’ मागणी

Published On: 

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधून लोकसभेवर निवडून गेलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां या काही दिवसांपासून वादात सापडल्यात. पती निखिल जैन यांच्यासोबत झालेले लग्नच भारतीय कायद्यानूसार अवैध असल्याचा नुसरत यांनी गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर आता नुसरत जहां यांच्या लग्नाचा वाद थेट संसदेत पोहोचला आहे. भाजपचे खासदार संघमित्रा मौर्य यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.

संघमित्रा मौर्य यांनी संसदेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप नुसरत जहाँ यांच्यावर केला आहे. तसेच, नुसरत जहाँ यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पत्रात म्हटले आहे की, नुसरत जहाँ यांनी माध्यमांना नुकत्याच दिलेल्या माहितीवरून त्यांनी लोकसभा सचिवालयाला जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिली असल्याचे स्पष्ट झाले आहे. खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन आपल्या मतदारांना हेतूपूर्वक फसवण्यासारखे आणि संसद व संसदेच्या सन्माननीय खासदारांची प्रतिमा खराब करण्यासारखे आहे. नुसरत जहाँ यांचे हे निवेदन प्रभावीपणे त्यांची खासदारकी अवैध ठरवत असल्याचा दावा मौर्य यांनी केलाय.

सभागृहात येताना नवरीचा पेहराव

मौर्य यांनी नुसरत जहां यांच्या लग्नाबद्दलही काही बाबी पत्रातून मांडल्या आहेत. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर नुसरत जहां पहिल्या दिवशी सभागृहात नवरीप्रमाणे तयार होऊन आल्या होत्या. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा नुसरत जहां यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाल्या होत्या, असा उल्लेखही मौर्य यांनी केला आहे.

काय म्हणाल्या होत्या नुसरत जहां?
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी नुसरत जहाँ यांनी एक निवेदन जारी केले होते. यात भारतामध्ये दोन धर्मांमधल्या लग्नांना विशेष विवाह कायद्यानुसार मान्यता मिळणे गरजेचे असते, पण आपण असे न केल्याने निखिल यांच्यासोबतचे आपले लग्न कधीच वैध नव्हते. कायद्यानुसार ते लग्न नसून लिव्ह इन रिलेशनशिप आहे, असे नुसरत जहाँ यांनी म्हटले होते. यानंतर वाद सुरू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!