Share

‘७० टक्के लसीकरणानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका’, ग्रामविकासमंत्र्यांची माहिती

Published On: 

कोल्हापूर : महाराष्ट्रात ७० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता नाही, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. तसेच लसीकरणासही या महिनाअखेरपर्यंत वेग येण्याची चिन्हे आहेत.

त्यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या औरंगाबाद, मुंबईसह राज्यातील दहा महानगरपालिकांच्या निवडणुका आणि जिल्हा परिषदाच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतले
आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘लेटरबॉम्ब’ ने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. यावर हसन मुश्रीफ यांनी भाष्य केले आहे. ‘स्थानिक पातळीवर काही शिवसैनिक दोन्ही काँग्रेसमध्ये आले असतील. मात्र मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते फोडण्याचे प्रकार घडलेले नाही. उलट कोल्हापूरमध्ये शिवसेनेचे सदस्य कमी असतानाही जिल्हा परिषदेत सर्वाधिक पदे दिली. गोकुळ दूध संघातही त्यांना स्थान दिले.

दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतले आहे, ही बाब त्यांनी लक्षात घ्यावी. उभय काँग्रेसमध्ये मात्र एकमेकांचे कार्यकर्ते ओढून घेण्याचे सत्र कायमच सुरू असते’, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!