🕒 1 min read
नवी दिल्ली: काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) सतत मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीला ‘थाळी बजाओ’ त्यानंतर मोबाईल टोर्च आणि मेणबत्ती लावण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. यावरूनच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) जगातील एकमेव पंतप्रधान असतील, ज्यांनी कोरोनाला ‘थाळी बजाओ’ असा प्रतिसाद दिला. हा उपक्रम फेल झाल्यानंतर त्यांनी मोबाईल टोर्च ही मोहीम राबवली. मात्र जनतेला ऑक्सिजन सिलिंडर नाही दिले. जनतेला वारेवर सोडून त्यांनी थाळी वाजवणे मोहीम राबवली. मात्र आता जनतेला थाळी- टाळी वाजवल्यानंतर डोके आपटायला सोडून दिले. असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे. याबाबत काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटरवर पोस्ट करण्यात आली आहे.
लॉकडाउन में थाली-ताली पिटवाई, अब जनता को सिर पीटने के लिए छोड़ दिया है। pic.twitter.com/PMUGvQECF7
— Congress (@INCIndia) March 1, 2022
दरम्यान सध्या भारतात रशिय-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन गंगा’ मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत ९०० विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आले आहे. मात्र अजूनही बरेच विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. तर एअर इंडियाकडून प्रवासी भाड्यातही वाढ करण्यात आली आहे. यावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
Operation Ganga: युक्रेनहून परतलेल्या १८२ विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी नारायण राणे विमानतळावर
-
खळबळजनक! पाकिस्तान दौऱ्यावर पोहोचताच ऑस्ट्रेलियन खेळाडूला जीवे मारण्याची धमकी
-
रस्ते अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांसाठी केंद्र सरकारचा ”महत्वाचा” निर्णय
-
Russia Ukraine war: नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सलग दुसऱ्या दिवशी महत्वाची बैठक
-
संजय राऊत मोठा बॉम्ब टाकण्याच्या तयारीत! ट्वीट करत म्हणाले, “नुकताच खेळ…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
