🕒 1 min read
मुंबई : भाजप आणि महाविकास आघाडीत ईडी कारवाईवरुन जोरदार वाद सुरू आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत व शिवसेनेवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी देखील पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्या यांच्यावर पलटवार केला होता. दरम्यान, संजय राऊत पुन्हा एकदा मोठा बॉम्ब टाकण्याच्या तयारीत आहेत.
आज संजय राऊत यांनी ट्वीट करत विरोधकांना इशारा दिला आहे. संजय राऊत म्हणाले, “नुकताच खेळ सुरु झाला आहे. आज पंतप्रधान कार्यालयाकडे केंद्रीय यंत्रणांच्या अधिकारांचा गैरवापर करून काही जणांना वेठीस धरण्यात आल्याचे पुरावे सादर केले. सोबतच काही अधिकारी ‘वसुली एजंट्स’ मार्फत खंडणी व ब्लॅकमेलिंगमध्ये गुंतल्याचे पुरावे देखील सादर केले”.
Game has just begun!
Today submitd evidences to @PMOIndia of hw Centrl Agencies r misusng powers selctivly agnst a few.Submitd proofs on hw sm officials r indulgd in extortion& blackmailng thru ‘Vasuli agents’.
Wil addrss a PC vry soon to share more details.
Watch this space!— Sanjay Raut (@rautsanjay61) February 28, 2022
तसेच याबाबत पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे संजय राऊत म्हणाले. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि त्याचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर राऊत यांनी आरोप केले होते. त्यामुळे राऊत आता नेमका कोणता खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
