Deepak Kesarkar । मुंबई : कोकणात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अखंड महाराष्ट्राने पहिला आहे. त्यातच शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील संघर्ष का अतिशय टोकाचा संघर्ष असल्याचं वेळोवेळी पाहायला मिळत. अशावेळी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी आज केलेल्या एका वक्तव्यामुळे या वादात अजून एक ठिणगी उडण्याची शक्यता आहे. नारायण राणेंच्या कुटुंबाकडून आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न झाला, असं गंभीर वक्तव्य केसरकर यांनी केलं आहे.
केसरकर म्हणाले, आदित्य ठाकरेंबद्दल जे बोललं जात आणि वस्तुस्थिती यामध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. ही वस्तुस्थिती आहे की सुशातसिंह राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या बदनामीचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये नारायण राणे यांचा मोठा वाटा होता. ठाकरे कुटुंबियांवर आमच्यासारखे लोक जे प्रेम करतात ते यामुळं दुखावले गेले होते. भाजपच्या अनेक ज्य़ेष्ठ नेत्यांचे माझे जवळचे संबंध आहेत. त्यामुळं मी त्यांना विचारलं होतं की, तुम्ही तुमचा प्लॅटफॉर्म तुम्ही कसा वापरु देता. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं होतं की, आमच्या बहुतांश आमदारांचा अशा प्रकारच्या बदनामीला विरोध आहे.
पुढच्या काळात उद्धव साहेबांची आणि पंतप्रधान मोदींची भेट झाली आणि जे काही मला उद्धवसाहेबांच्या आणि पंतप्रधान मोदींच्या बोलण्यातून समजत होतं की, खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख कसा असावा, हे पंतप्रधान महोदयांनी त्याठिकाणी दाखवून दिलं. तर मोदींशी संबंध जपण्यास ठाकरेंनी तयारी दाखवली होती. 12 आमदारांचं निलंबन झालं तेव्हा भाजपसोबत बोलणी सुरु होती. नारायण राणेंचा त्याचवेळी केंद्रात समावेश झाला. राणे केंद्रात गेल्याचं ठाकरेंना आवडलं नाही आणि बोलणी रखडली, असंही केसरकरांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Yashomati Thakur | महागाई आणि दडपशाही या मोदीनितीचा निषेध – ॲड. यशोमती ठाकूर
- Ranveer singh | न्यूड फोटोशूटनंतर रणवीरला आली एका अनोख्या शूटची ऑफर; ‘पेटा’ने पाठवले पत्र
- Navneet Rana and Ravi Rane | “ते प्रकरण हलक्यात घेत आहेत” ; राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची पोलिसांकडून मागणी
- Congress । काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनाचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद; नाना पटोलेंसह प्रमुख नेते पोलिसांच्या ताब्यात
- Congress | देशात लोकशाहीची हत्या, भाजपविरोधात राहुल गांधी आक्रमक! पोलिसांनी घेतले ताब्यात


