Share

Navneet Rana and Ravi Rane | “ते प्रकरण हलक्यात घेत आहेत” ; राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्याची पोलिसांकडून मागणी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईतील विशेष न्यायालयाने गुरुवारी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना फटकारले. खरेतर, राणा दाम्पत्याला देशद्रोहाच्या गुन्ह्यात दिलेला जामीन रद्द करण्यासाठी मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या याचिकेशी संबंधित कार्यवाहीत वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून हजर न राहिल्यामुळे त्यांना सामोरे जावे लागले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण प्रकरणात मे महिन्यात दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी दोघांना जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीन अटींचे उल्लंघन करून त्यांनी मीडियासमोर या प्रकरणावर भाष्य केले होते आणि त्यामुळे त्याचा जामीन रद्द करावा, अशी याचिका पोलिसांनी दाखल केली होती.

गुरुवारी जेव्हा हे प्रकरण सुनावणीसाठी आले तेव्हा राणा दाम्पत्य किंवा त्याचे वकील उपस्थित नव्हते. सरकार बदलल्यापासून राणा दाम्पत्य न्यायालयात हजर नसून ते प्रकरण हलक्यात घेत आहेत, असे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाला सांगितले. या दाम्पत्याचे वकील नंतर हजर झाल्यानंतर, न्यायालयाने सांगितले की जेव्हा हे प्रकरण पटलावर आले. तेव्हा ते राणा दाम्पत्य किंवा कोणताही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी 11 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली.

उमेश कोल्हे यांच्या घरासमोर देखील हनुमान चालिसाचे पठण –

 

यापूर्वी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनीही अमरावती येथील उमेश कोल्हे यांच्या घरासमोरील मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. कोल्हे यांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली होती. अमरावतीतील दहशतीचे वातावरण दूर करण्यासाठी आणि कोल्हे कुटुंबीयांना हा हल्ला सहन करण्याची शक्ती मिळावी यासाठी कोल्हे यांच्या घरासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आल्याचे राणा दाम्पत्याने सांगितले होते.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांनी मृत उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. खासदार नवनीत राणा यांनी कोल्हे यांच्या मुलाला वडिलांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले होते.

काय आहे प्रकरण?-

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खाजगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केली होती, त्यानंतर शिवसैनिकांच्या प्रचंड विरोधानंतर त्यांनी रद्द केली. संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम केल्याचा आरोप केला होता. या दोन्ही नेत्यांना २३ एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ‘वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व निर्माण केल्याप्रकरणी’ या दोन्ही नेत्यांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मुंबई पोलिसांनी आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा यांच्या विरोधात खार पोलीस ठाण्यात कलम १५३ (ए), ३४, आयपीसी आर/डब्ल्यू ३७(१) १३५ मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!