🕒 1 min read
महाराष्ट्र देशा डेस्क : रणवीर सिंग सध्या त्याच्या न्यूड फोटोशूट केल्यामुळे चर्चेत आहे. या शूटमुळे 25 जुलैला एका एनजीओने रणवीर विरोधात मुंबईत एफआयआर दाखल केली होती. रणवीरने सोशल मीडियावर न्यूड फोटो शेअर करून महिलांच्या भावना दुखावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. याशिवाय इतर अनेक वादही या फोटोशूटमुळे उफाळून आले आहेत. पण यातच आता ‘पेटा’ ने (पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स) रणवीरला बोल्ड फोटोशूटसाठी आमंत्रण दिले आहे. पेटाने त्याला ‘विगन’ मोहिमेचा प्रचार करण्यासाठी हे आमंत्रण पाठवले आहे. यासंदर्भात त्यांनी रणवीरला एक पत्र देखील पाठवले आहे.
रणवीर सिंगला पाठवलेल्या या पत्रात पेटाने लिहिले आहे कि, “आम्ही तुमचे मासिकासाठी केलेले न्यूड फोटोशूट पाहिले आहे. आम्ही आशा करत आहोत कि, तुम्ही आमच्या विगन मोहिमेसाठी तसेच एक बोल्ड फोटोशूट कराल. आम्हाला माहित आहे कि तुम्ही प्राण्यांवर खूप प्रेम करता. तुम्ही PETA इंडियाच्या जाहिरातीसाठी फोटोशूट कराल का? या जाहिरातीची टॅगलाइन “All Animals Have Same Parts – Try Vegan” अशी आहे.” तर या पत्रात पेटा’ने अमेरिकन मॉडेल पामेला अँडरसनचे उदाहरणही दिले आहे. पेटाच्या या मोहिमेसाठी त्यांनीही फोटोशूटही केले आहे.
फिल्मसाठी रणवीर झाला विगन
रणवीरने नुकतेच त्याच्या आगामी ‘रॉकी आणि रानी की लव्हस्टोरी’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटासाठी रणवीर पूर्णपणे शाकाहारी झाला होता आणि त्याने विगन डाएट फॉलो केले होता. त्यामुळेच पेटाने रणवीरला त्यांच्या या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिले असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात रणवीरसोबत आलिया भट्ट, जया बच्चन, धर्मेंद्र आणि शबाना आझमी देखील दिसणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- Congress । राहुल-प्रियंका गांधी दिल्ली पोलिसांच्या ताब्यात; अक्षरश: फरफटत घेऊन गेले
- Thackeray vs Shinde | ग्रामपंचायत निवडणुकीत ठाकरे गटाला झटका ; बीड तालुक्यात शिंदे गटाने फडकवला झेंडा
- Rakhi sawant | राखी सावंतच्या बॉयफ्रेंडला बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी; पहा व्हायरल VIDEO
- Sunil Raut। उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवणार; सुनील राऊतांचा दावा
- Sunil Raut । संजय राऊतांच्या भोंग्यामुळे एकनाथ शिंदेंना नगरविकास मंत्रिपद मिळालं – सुनील राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
