पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान त्यांना चांगलेच भोवले आहे. त्यांना मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर समर्थकांनी एकच जल्लोष केला.
दरम्यान, अद्यापही हा वाद कायम आहे. काही महिन्यांपूर्वी सेना भवन येथे भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्यानंतर दोन्ही पक्षातील संघर्ष वाढलेला असतानाच गेल्या २ दिवसातील राड्यामुळे सेना-भाजप अधिक दुरावल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी नारायण राणे यांचे शिवसेनेतील योगदानाची आठवण करून देत शिवसैनिकांचा समाचार घेतला आहे.
‘नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री होते. आता जे शिवसैनिक त्यांच्या अंगावर जात आहेत ती शिवसेना उभी करण्यात त्यांची मोठी भूमिका आहे. राणेंची भाषा आणि शैली वेगळी आहे. भाजपमध्ये त्यांच्या येण्याने फायदाच झाला आहे. एखादा शब्द चुकतो. गोपीचंद पडळकर यांचा देखील शरद पवारांबद्दल शब्द चुकला होता. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सूचना केल्यानंतर आता त्यांनी तसा एकही शब्द पुन्हा वापरला नाही. शब्द चुकल्यास ते समजावून सांगण्याची एक व्यवस्था आहे. राणे साहेब भाजपमध्ये आल्याने आम्हाला फायदाच आहे, आम्ही आनंदी देखील आहोत,’ असं भाष्य चंद्रकांत पाटील पुण्यात एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अखेर MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचा मार्ग मोकळा; ‘या’ तारखेला होणार परीक्षा, ऍडमिट कार्ड जारी
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- ‘राणेंचं बोलणं योग्य, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’, भाजपकडून राणेंची पाठराखण
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘ठगांपासून वाचण्यासाठी राष्ट्रपती राजवट हाच एकमेव मार्ग!’, नितेश राणेंच्या विधानाने खळबळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

