Share

नारायण राणेंनी संभाजीराजेंचा आदर्श घेतला पाहिजे ; राऊतांचा टोला

Published On: 

मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर साध्य महाराष्ट्रातील राजकारणात राजकीय घमासान होत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत असून नेते मंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगला असून मूळ मुद्दा बाजूला राहतोय की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपचे खासदार नारायण राणे यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवत आहेत. दरम्यान आता शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणावरून नारायण राणे यांनी भाजपचेच खासदार असलेल्या संभाजीराजेंवर टीका केली आहे. मात्र, शिवसेनेकडून नारायण राणे यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संभाजीराजे मोठं व्यक्तिमत्त्व, नारायण राणेंनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

तसेच त्यांनी भाजपचे दोन्ही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्यासह खासदार नारायण राणे यांच्यावर निशाणा साधला. मराठा आरक्षणासाठी एकीकडे भाजपचेच खासदार असलेले संभाजीराजे नवे आंदोलन उभे करत आहेत, तर दुसरीकडे नारायण राणे संभाजीराजेंच्या भूमिकेवर संशय घेत आहेत, असे विनायक राऊत म्हणाले.

संभाजीराजे छत्रपती मोठे तसेच आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. नारायण राजे स्वतःच्या स्वार्थासाठी पक्ष बदलत असतात. तशी कारकीर्द संभाजीराजेंची नाही. संभाजीराजे आणि नारायण राणे यांची तुलना कधीही होऊच शकत नाही. संभाजीराजेंचा नारायण राणे यांनी आदर्श घेतलाच पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली. तसेच भाजपचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सध्या काहीच काम नाही. दिल्लीवाल्यांनीदेखील फडणवीसांना बाजूला केले आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना आता एकच काम राहिले आहे आणि ते म्हणचे ठाकरे सरकारवर टीका करणे. बाकी त्यांना काही काम नाही, असा आरोप राऊत यांनी केला आहे.

दरम्यान काल विनायक राऊत यांनी मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिले लावले हे सर्वांनाच माहीत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हातून दिला गेला याचंच आश्चर्य वाटतं, अशा शेलक्या शब्दात राणेंवर टीका केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!