पुणे – देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातले असून लसीकरण करण्यावर सध्या भर देण्यात येत आहे. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण करण्यात व्यत्यय येत असल्याचे सर्वत्र दिसत असून नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात नुकताच महाराष्ट्राने २ कोटीचा टप्पा ओलांडला असल्याचे घोषित करण्यात आले आहे.एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांना लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे असा देखील दावा करण्यात येत आहे
दोन कोटी लोकांना लस दिल्याचा महाराष्ट्र सरकारचा दावा फसवा आहे अशी सध्या सोशल मिडीयावर चर्चा सुरु झाली आहे.राज्य सरकारच्या या दाव्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असून उलटसुलट चर्चा सुरु आहे. राज्य सरकारने या बाबत घोषणा करताना लोकांचा नव्हे तर लसीकरणाचा टप्पा पार केल्याचे म्हटले आहे हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागेल.
आकड्यांचा खेळ
दोन डोस घेतल्यानंतर लसीकरण पूर्ण झाले असे म्हणता येते. प्रत्यक्षात आकडे असे जर पहिले तर पहिला डोस १,५७,४३८५४ जणांना देण्यात आला आहे तर दुसरा डोस एकूण ४२,९७,७८४ जणांना देण्यात आला आहे. एकूण २,००,४१,६४८ म्हणजे लसीकरण पूर्ण झालेल्यांची संख्या फक्त ४२ लाख ९७ हजार ७८४ एवढी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसीकरण होणे ही देखील एका अर्थाने ही सुद्धा मोठी उपलब्धी आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही मात्र २ कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले नाही हे देखील सत्य नाकारून चालणार नाही.
शासनाने केलेल्या दाव्यावरून काहीसा गोंधळ उडाला असून लसीचा एक डोस घेऊन लसीकरण पूर्ण झालं असा दावा करता येईल काय? हा मुख्य प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.दरम्यान,शासनाने लस दिल्याचे म्हटले आहे, दोन्ही लस दिल्या असा उल्लेख केलेला नाही. दोन कोटी लस दिल्या आहेत, दोन कोटी लोकांना नाही हे लक्षात घ्यावे लागेल. लसीकरण पूर्ण झाले असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा नागरिकांना दोन्ही डोस मिळतील.त्यामुळे या आकड्या नुसार जवळपास 43 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे असं म्हणता येईल.
महत्वाच्या बातम्या
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- ‘मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी संघटना तयार करून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करावेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

