पुणे : महाराष्ट्राला खूप मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. परकीय गुलामगिरीतून मुक्ती मिळवण्यासाठी व स्वराज्याची निर्मितीचे बळ हे याच गडकिल्ल्यांमधून मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य, स्वातंत्र्य याची मशाल पेटवली. इतकंच नाही तर हिंदवी स्वराज्याची निर्मिती देखील केली.

त्या भव्य ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार असलेले गड-किल्ले आजही महाराष्ट्रात, सह्याद्रीच्या कणखर दगडांच्या आधारावर उभे आहेत. दरम्यान, राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो. राजगडाची भव्यता आजही टिकून असून तरुणाईला देखील या गडाचे अप्रूप आहे.

त्या कालच्या ऐतिहासिक वास्तू जरी आज पूर्णपणे गड-किल्ल्यांवर सुस्थितीत नसल्या तरी या किल्ल्यांच्या पोटात मात्र मोठा इतिहास दडला आहे. त्यामुळेच रायगड पाठोपाठ अनेक किल्ल्यांमध्ये तज्ज्ञ मंडळींच्या साहाय्याने उत्खननाचे कार्य हे अनेक शिवप्रेमी संघटनांनी घेतले आहे. राजगड किल्ल्यावर साफ सफाईचे काम सुरू असताना काही ऐतिहासिक वस्तू सापडल्या आहेत.

सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गप्रेमी संस्थेच्या वतीने साफ सफाईचे काम सुरू असतानाजमिनीखाली काही वस्तू सापडल्या आहेत. यात काही पुरातन नाणी, तोफेचे गोळे, तलवारीचे पाते, देवीच्या लहान मुर्ती आणि लोखंडी अडकित्ता आदींचा समावेश आहे. आता या सर्व वस्तू अधिक अभ्यासासाठी पुरातत्व वाभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. सापडलेल्या नाण्यांपैकी काही पेशवेकालीन आणि काही ब्रिटिशकालीन असावीत असा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ अधिकाऱ्याच्या विधानाशी आमचा संबंध नाही; या लढाईत आम्ही सरकार सोबत आहोत – सीरम
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड, पैसे मोजण्यासाठी मागवाव्या लागल्या मशीन्स
- कोरोनावर निश्चितच विजय मिळवू, कोरोनाची तिसरी लाट आपण थोपविणारच – तात्याराव लहाने
- नवीन पेट्रोलपंप सुरू करण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी! पैशासाठी विवाहितेचा छळ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

