मुंबई : राज्यपालनियुक्त १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. राज्यपालांना दिलेली १२ आमदारांची यादी भुतांनी पळवली तर नाही ना?, अशी खोचक टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यानंतर आता १२ आमदारांची यादी राजभवनात सुरक्षित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या गोंधळावर राऊत यांनी मार्मिक शब्दात प्रतिक्रिया दिली. ‘हरवलेली फाईल मिळाली, ही आनंदाची गोष्ट आहे. पण त्या फाईलवर राज्यपाल जेव्हा सही करतील, तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू’ असे ते म्हणालेत.
तसेच ‘राजभवनातील फाईल भूताने पळवली असं मला वाटत होतं. पण आता फाईल मिळाली म्हणजे ती भुताने पळवलेली नव्हती. पण असं असलं तरी राजभवनाच्या आसपास काही भूतं असावीत’ असा टोला त्यांनी भाजप नेत्यांना लगावला. ‘फाईलच्या मुद्द्यावर उच्च न्यायालयाने प्रश्न विचारला आहे. फाईलवर वेळेत न होण्यासाठी ती फाईल बोफोर्स, राफेल किंवा कोणत्या भ्रष्टाचाराची आहे का?’ असा सवालही त्यांनी केला.
संजय राऊतांना कामधंदा नाही
विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले आहे. राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीबाही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रियंका, कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही’
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
- ‘मोदींच भावनिक होणे आणि डोळ्यातले अश्रू म्हणजे ठरवून केलेला कार्यक्रम’
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
