मुंबई – कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता मुंबई शहरात लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर उभारावीत अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात हाहाकार माजला आहे. लहान मुलांना कोरोना प्रतिबंधक लस अद्याप आलेली नाही, त्यातही तिसऱ्या लाटेत लहान मुलांना व १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना कोरोनाचा धोका जास्त होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट थोपविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता पुणे महापालिकेमार्फत लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. यामध्ये लहान मुलांसह त्यांच्या पालकांना राहण्याची सोय, लहान मुलांसाठी पक्षी, प्राण्यांची चित्रे, खेळणी, लहान मुलांची व्हिडीओ गाणी अशा अनेक खास सुविधा देण्यात आल्या आहेत. तरी पुणे महापालिकेच्या धर्तीवर मुंबई महापालिकेमार्फत देखील लहान मुलांसाठी कोविड सेंटर उभारण्यात यावे. तसेच यासाठी आवश्यक बालरोग तज्ञांची देखील नेमणूक करावी अशी मागणी स्थायी समिती सदस्य शिरसाट यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- ‘प्रियंका, कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही’
- जाणून घ्या दोन कोटी लसीकरणाचा महाराष्ट्र सरकारचा दावा फसवा आहे का ?
- राजगडाच्या मातीतून ऐतिहासिक वस्तूंचा उलगडा; सह्याद्री प्रतिष्ठानला सापडल्या अनमोल गोष्टी !
- ‘मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी संघटना तयार करून राज्य सरकारवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करावेत’
- ‘..तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू’, संजय राऊतांची मार्मिक प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

