Share

मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधम बापाला ५ वर्षे सक्तमजुरी

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: बाप नात्याला काळिमा फासणारया पोटच्या तेरा वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पित्याला विविध कलमांखाली पाच वर्षे सक्तमजुरी व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा शुक्रवारी (१२) विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी यांनी सुनावली.

या प्रकरणातील पीडिता ही फुलंब्री तालुक्यातील आहे. घटना ७ एप्रिल २०२० रोजी घडली. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलिस ठाण्यात पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे पीडितेचा रिक्षाचालक पिता हा घरीच होता. आई शेतीत कामाला गेल्यानंतर पिता पीडितेशी लगट करायचा. रात्रीही जवळ येऊन अश्लील स्पर्श करायचा. त्याची माहिती आईला दिल्यानंतर पित्याने पीडितेसह तिच्या आईला चाकू दाखवून धमकी दिली व घरातून निघून गेला.

या संदर्भातील तक्रार दाखल झाल्यानंतर फुलंब्रीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत यांनी दोषारोपपत्र दाखल केले. विशेष जिल्हा सरकारी वकील सुदेश सिरसाठ यांनी पाच साक्षीदारांचे जबाब नोंदवले. फिर्यादी, तिची आई व मुख्याध्यापक यांची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने नराधम बाप असलेल्या आरोपीला शिक्षा सुनावली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!