Share

तान्हुल्यांना रक्तबंबाळ आईच्या मृतदेहापाशी सोडून पाळणारा नराधम बाप अटकेत

Published On: 

औरंगाबाद : किरकोळ वाद होऊन रागाच्या भरात पत्नीच्या डोक्यात डंबेल्स मारून खून करून, त्यानंतर दोन मुलांना मृतदेहासोबत घरातच कोंडून, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीला आणि आठ वर्षाचा मुलगा व चार वर्षाच्या मुलीला घरात कोंडून आरोपी पती पसार झाला होता. ही दोन लहान मुले अख्खा दिवस त्यांच्या आईच्या मृतदेहाशेजारीच बसून होती. रडून रडून या मुलांचे हाल झाले होते. ही खळबळजनक घटना पिसादेवी परिसरात रुक्मिणी स्क्वेअरमध्ये उघडकीस आली होती. यातील नराधमाला चिकलठाणा पोलिसांनी २८ दिवसानंतर रविवारी बेड्या ठोकल्या आहे. सिद्धेश गंगाशंकर त्रिवेदी (३५, रा. रुक्मिणी स्क्वेअर, पिसादेवी) असे आरोपीचे नाव आहे.

पिसादेवी भागात राहणाऱ्या सिद्धेशने प्लॉट घेण्यासाठी पत्नीचे दागिने परस्पर विकून पैसे घराच्या कपाटात ठेवले होते. घर काम करत असताना त्याच्या पत्नीची नजर त्या पैस्यांकडे गेली. या पैस्यांची विचारणा पत्नी वारंवार करू लागल्यामुळे सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली, परंतु सिद्धेश योग्य दाद देत नसल्याने पत्नीने पुन्हा विचारणा करण्यास सुरु केले. या वेळी सिद्धेशचा राग अनावर झाला, त्यांने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातच रागाच्या भरात त्याच्या हाती डम्बेल्सचा रोड लागला, त्या रोडने त्याने त्याच्या पत्नीच्या डोक्यावर वार केला. त्यात ती रक्तबंबाळ झाली. इथे हि न थांबता त्याने बाथरूम मधील कपडे धुण्याचा दगड आणत तिच्या डोक्यात घालून तिला ठार केले. आणि घरून पैसे आणि स्कुटी घेऊन निघून गेला.

तो खून करून घरातून थेट स्कुटीवर पुण्याकडे गेला तिथे काही दिवस राहिल्यानंतर त्याने स्कुटी तिथेच लावली, नंतर थेट दिल्ली गाठली. तिथे एक दोन दिवस राहिल्यानंतर तो तिथून कुलू मनालीला गेला तिथून तो अहमदाबादला आला एक दोन राहिल्यानंतर मागील चार ते पाच दिवसापासून तो दिव दमन येथे होता. याच दरम्यान त्याने सासुरवाडीला पश्च्यातापाचे पत्र पाठवले आणि इथेच तो फसला.

सिद्धेशचे पत्र आल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्या पत्राच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढायला सुरुवात केली. त्यावरून तो दमणला असल्याचे समजले. दमन मध्ये तो एक दिवस हॉटेलमध्ये राहिला परंतु पैसे संपल्यामुळे त्याने दिवस रात्र बीचवर काढले. पैसे संपल्यामुळे त्यांने पैसे मिळवण्यासाठी काहींकडे हालचालीही केल्या परंतु तिथे त्याला काहीच नाही मिळाले. सध्या सिद्धेशची मुले त्यांच्या आजी आजोबाकडे आहे, परंतु सिद्धेशच्या एका चुकीमुळे संपूर्ण परिवार विखुरल्याचे तेथील रहिवासी सांगत होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!