🕒 1 min read
नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे वैयक्तिक कारणासाठी विदेशात रवाना झाले आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी काही दिवसांसाठी वैयक्तिक कारणासाठी परदेशात गेले आहेत.
पार्ट टाइम पॉलिटिक्स, फ़ुल टाइम पर्यटन और पाखंड जो नेता करेगा, उसको नानी याद आएगी और जब नानी याद आती है तो वो कहां पहुंच जाते हैं इसका पता सिर्फ उनको ही होता है: केंद्रीय मंत्री और बीजेपी नेता मुख्तार अब्बास नक़वी pic.twitter.com/kvp0hM4b2y
— ANI_HindiNews (@AHindinews) December 29, 2020
मात्र, दुसरीकडे भाजप नेत्यांकडून सातत्याने राहुल गांधींवर निशाणा साधला जात आहे. केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी राहुल गांधींवर हल्ला करत म्हटलं की, पार्ट टाइम पॉलिटिक्स, फुल टाइम पर्यटन आणि पाखंड जो नेता करेल त्याला त्याच्या आजीची आठवण येणार असं म्हणत टोमणा मारला आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी देखील राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी आले नाहीत. त्यांनी आमच्याशी संवादही साधला नाही. ते सर्वकाही हवेत करत आहेत. अशावेळी विरोधी पक्षाने मजबूत असायला हवे. पण विरोधी पक्ष प्रचंड कमकुवत असल्याचे टिकैत यांनी म्हटले.
दरम्यान,राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असताना काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगापाल यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधी आपल्या आजीला भेटण्यासाठी इटलीला गेले आहेत. हे चूकीच आहे का? वैयक्तिक दौरा करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, असे म्हणत भाजप खालच्या पातळीवरचे राजकारण करत असल्याचा टोला केसी वेणूगापाल यांनी भाजपला लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- भुजबळ, वडेट्टीवारांची हकालपट्टी करा, मराठा आंदोलकांची राज्यपालांकडे मागणी
- सरकारने निर्यात बंदी उठवताच कांद्याच्या भावात वाढ; शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
- प्रकाश आंबेडकरांचा समाजाला कुठलाही फायदा झालेला नाही; रामदास आठवलेंची टीका
- …मग संजय राऊतांच कुटुंब चौकशीपासून लांब का पळतंय? भाजप नेत्याची जहरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
