Share

‘नाना पटोलेंची भूमिका सरकारला सुरुंग लावणारी’ ; अजितदादांचा आक्रमक पवित्रा

Published On: 

मुंबई : ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून आहेत,’ असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. लोणावळ्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलताना पटोले यांनी हे खळबळजनक वक्तव्य केल. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीत वाद आणि बेबनाव निर्माण होण्याची चिन्हे होती आणि सध्या तेच होत असल्याचे चित्र दिसत आहे.

नाना पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच संतापले आहेत. नाना पटोलेंची भूमिका ही महाविकास आघाडीला सुरुंग लावणारी आहे, अशा शब्दात अजित पवारांनी आपली नाराजी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्त केली आहे अशी माहिती एका वृत्तवाहिनीने प्रसारित केली आहे.

तसेच यावेळी ते म्हणाले कि, ‘महाविकास आघाडीला सुरुंग लावला जातोय, ‘नाना पटोले हे नेते किंवा मंत्री नाहीत, ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. नाना पटोलेंची भूमिका मविआला कमकुवत करण्याची आहे. महाविकास आघाडीला अडचणीत आणणारी आहे, असे देखील अजित पवारांचं म्हणणे आहे.

तसेच लोणावळ्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना नाना पटोले यांनी आणखी एक खळबळजनक वक्तव्य केलं आहे. ‘स्वबळाच्या घोषणेमुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे, हे त्यांना कळत नाही. कुठेतरी आपल्याला पिंजऱ्यात आणण्याचा प्रयत्न करणार,’ असाही आरोप यावेळी त्यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!